*सोरिओसीस -पित्तम कृष्ण*
त्वचारोगांतील सर्वात त्रासदायक आजार म्हणजे सोरीओसीस होय psoriasis म्हणजे to itch होय त्या आजारात रुग्ण हा सतत खाजवत असतो त्या आजाराला psoriasis असे म्हणतात 
१. त्वचेला सूज येने.
२. त्वचेला भेगा पडणे. 
३.त्वचेवर लाल किंवा काळे डाग पडणे 
४.डोक्यात कोंडा होणे 
हि लक्षणे प्रामुख्याने दिसतात .

आजाराची कारणे
१. याचे महत्वाचे कारण म्हनजे मानसिक ताण तणाव होय जेवढे जास्त ताण तणावांवर जेवढा जास्त ताणतणाव होय म्हनून जास्त विचार करणाऱ्या किंवा मानसिक त्रास करून घेणाऱ्या रुग्णांना हे लवकर होतात
२. खाण्यापिण्यातील बदल: 
मसालेदार तिखट तेलकट पदार्थ जास्त खाणे बेकरीचे पदार्थ जास्त खाणे हे सर्व कारणांनी शरीरातील उष्णता जास्त वाढते 
३.इतर आजार: प्रामुख्याने आधी झालेले किंवा असलेले आजार म्हणजे कावीळ प्रेमेट ,TB होणे गोवर असणे ह्या कारणांनी सोरिओसीस होतो.

*सोरिओसीस उपचार*
आयुर्वेद नुसार सोरिओसीस वर उपचार करताना प्रामुख्याने आयुर्वेद औषधे ,पंचकर्म चिकित्सा ह्या दोन प्रकारे केली जाते 
१. आयर्वेदीक औषधें :
यात प्रामुख्याने आयुर्वेद वनस्पतीपासून तयार केलेले विविध औषधांचा वापर केला जातो यात प्रामुख्याने विविध प्रकारच्या गोळ्या टॅबलेट काढे चुर्ण ह्यांचा वापर शरीरात  तयार झालेली उष्णता हि बाहेर काढून टाकली जाते तसेच त्यानंतर रक्त चांगली करणारी औषध देऊन त्वचेची प्रतिकार शक्ती वाढवली जाते 
२. पंचकर्म चिकित्सा 
ह्यात प्रामुख्याने वमन ,विरेचन ,शिरोधारा, नस्य, बस्ती, ह्या पंचकर्माचा उपयोग होतो